उष्माघाताचे दुष्परिणाम जाणून घेऊया

                             उष्माघात 

 ष्माघात म्हणजे हिट स्ट्रोक होय. यामध्ये प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने आपल्या शरीरातील उष्णता संतुलन करणारी संस्था बिघडते. जर आपण उष्णतेमध्ये बराच वेळ काम केले आणि आपण पाणी किंवा इतर तरल पदार्थांचे सेवन नाही केले तर ही परिस्थिती उद्भवते. अति उष्णतेने शरीरातले तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. उष्माघात झाल्यावर आपले शरीर हे उष्ण हवामानाच्या संपर्कात तापमान 40°सेंटीग्रेड ठेवू शकत नाही. त्यामुळे वेळेवर उपचार झाले नाही तर व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची भीती असते. 

                                उष्माघात हा कमी पाणी पिणारे, वयोवृद्ध, अर्भक, दीर्घ आजारी, यासारख्या लोकांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुफुसाचे आजार, रक्तदाब, मधुमेह, असणाऱ्या लोकांमध्ये आढळतो उष्माघाताची लक्षणे यामध्ये दरदरून घाम येणे, थकवा, मळमळ, आकडी येणे, अशी लक्षणे आहेत बेशुद्ध होणे हे वयस्कर माणसांमध्ये आढळून येणारे पहिले लक्षण असू शकते. 

उपचारबेशुद्ध पडलेल्या माणसाला प्रथम थंड हवेच्या ठिकाणी नेने. पहिल्यांदा त्या व्यक्तीच्या अंगातली उष्णता कमी करायची  आहे. त्यासाठी त्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे शक्य होतील तितकी कमी करायची आहेत. ती व्यक्ती बेशुद्ध आहे की जागी आहे ते पाहणे. जर बेशुद्ध असेल तर सीपीआर द्यावा. शक्य असेल तर पाण्याचा वर्षाव करावा. बर्फ असेल तर बर्फाचा शेक द्यावा. उन्हामुळे जर नाकातून रक्त येत असेल तर नाकाच्या मांसल भागावर दाब द्यावा. उष्माघात जर प्रारंभीचा असेल तर दोन दिवसात बरा होऊ शकतो. पण अवयवा वर आघात झाला असेल तर बरे होण्यासाठी दोन महिने किंवा एक वर्ष लागू शकते. 

              उन्हापासून घ्यावयाची काळजी

  1. दररोज तहान नसली तरी गरजेप्रमाणे पाणी पीत जावे.
  2. नारळ पाणी, फळांचा रस, ताक, लस्सी, घेत जावे. जेणेकरून शरीरातील पाण्याचे प्रमाण समतोल राहील. 
  3. प्रखर उन्हात फिरू नये.
  4. कानाला कपडा बांधावा जेणेकरून उष्णता काना मार्गे जाण्यास मज्जाव होईल.
  5. ढिले कपडे वापरावे.  

                               टीप                                                  ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही कोणत्याही आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

वाचा –आयुर्वेदातील पाच महत्त्वाच्या औषधांची माहिती जाणून घेऊया

Leave a Reply