प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र

‍Pradhanmantri suryghar yojana 2025

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र

Pradhanmantri suryghar yojana 2025
Pradhanmantri suryghar yojana 2025

सूर्य घर योजना काय आहे?

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना ही एक सरकारी योजना आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू केली आहे. याचा उद्देश देशभरात सौरऊर्जेचा अवलंब व्हावा हा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान 40% पर्यंत असणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून एक कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे. तसेच यामध्ये 750021 कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना विज बिल भरण्याची गरज लागणार नाही. 2024-25 च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. भारत सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणी संस्था(NPIA) आणि राज्यस्तरावर राज्य अंमलबजावणी संस्था (SIA) द्वारे अमलात आणली जाईल.

पंतप्रधान सूर्य घर मोफत विज योजना कशी काम करते?

या योजनेअंतर्गत दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी सौर युनिट किमतीच्या 60% आणि दोन ते तीन किलो वॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली किमतीच्या 40% अनुदानाची तरतूद आहे. अनुदानाची मर्यादा तीन किलो वॅट क्षमतेपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. सध्याच्या बेंच मार्क किमतीनुसार याचा अर्थ एक किलोवॅट सिस्टीम साठी 30000 रुपये व दोन किलोवॅट सिस्टम साठी 60 हजार रुपये आणि तीन किलो वॅट किंवा त्याहून अधिक सिस्टम साठी 78 हजार रुपये अनुदान असेल.

योजनेसाठी अर्ज करण्यास कोण पात्र आहे?

1).अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक.

2).सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असणे आवश्यक.

3).घरामध्ये वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक.

4).कुटुंबाने सौर पॅनल साठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

1).अधिकृत वेबसाईटवर जा. (PM Suryghar Yojana)

2).प्रथम इच्छुक ग्राहकाने राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी हे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडून करावे लागेल.

3).तुमचा विद्युत ग्राहक क्रमांक नोंद करा.

4).मोबाईल क्रमांक तसेच ईमेल पत्ता नोंद करा.

5).ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांक आणि लॉगिन करा.

6).रूफ टॉप सोलर साठी साठी अर्ज करा.

7).ऑनलाइन अर्ज भरा.

8).मान्यताप्राप्तीची प्रतीक्षा करा – डिस्कॉम कडून मान्यता मिळाल्यानंतर तुमच्या डिस्कॉम मध्ये नोंदणीकृत विक्रेत्याकडून संयंत्र स्थापित करा.

9).संयंत्र तपशील जमा करा आणि नेट मीटर साठी अर्ज करा.

10).डिस्कॉमद्वारे तपासणी झाल्यानंतर ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.

11).कमिशनिंग अहवाल मिळाल्यानंतर पोर्टलवरून बँक खाते तपशील आणि रद्द झालेल्या चेक जमा करा तुमच्या बँक खात्यात तीस दिवसात सबसिडी प्राप्त होईल.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र

पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करते. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल तयार केले जाईल. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूफ टॉप सोलर सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केली जाईल. याशिवाय उत्पन्न वाढविणे, विज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

घरकुल लाभार्थ्यांना मिळणार अतिरिक्त पंधरा हजार रुपये

घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून छतावर एक किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान मिळेल. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना सदरील रुपये 15000 अनुदान देय असणार नाही.

FAQ

१).प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना म्हणजे काय आणि या योजनेचा उद्देश काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनाची घोषणा केली. ही रूफटॉप सोलर योजना आहे. ज्यामध्ये ७५,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे.

२).सूर्य घर योजना काय आहे?

पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही भारत सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ७५,०२१ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश सुमारे १ कोटी कुटुंबांना सौरऊर्जा उपलब्ध करून देणे आणि त्यांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज पुरवणे आहे.

३). अधिकृत संकेतस्थळ

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

हे पण वाचा

शेअर मार्केट मराठी माहिती 2025

आषाढी एकादशी वारी मराठी माहिती 2025

गुरुचरित्र ग्रंथ मराठी माहिती २०२५

Leave a Reply